आगे मोहाच्या प्रसंगातून प्राण वाचविले.

माझे भाचे वसंत फोकमारे यांचे करीता मुलगी पाहण्यासाठी परमपूज्य श्री सद्गुरु भाऊ महाराज यांनी आम्हाला काकनवाडा येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2009 मध्ये नेले. परमपूज्य श्री सद्गुरू भाऊ महाराजांचे सोबत लासुरा बु. येथील श्री रामराव ढोले पाटील हे होते.” मुलगी पाहण्यास जाण्यासाठी मोठी गाडी सांगू नका, मी तुमच्या मोटरसायकलवर येतो. तसेच इतरांसाठी ऑटो सांगा. खर्च कमी करा. विनाकारण खर्च करू नका.” असे सांगितल्यावरून त्यानुसारच जाण्याची ठरले. परमपूज्य सद्गुरु भाऊ महाराज लासुरा येथून सकाळी 7.30 वाजता माझे मोटर सायकल वर बसले. व ऑटो मध्ये श्री रामराव पाटील वसंत फोकमारे व इतर व्यक्ती होत्या.

काकनवाडा येथे सकाळी 9 वाजता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भाऊ आम्हास सर्वांना म्हणाले की, आपण आता वारी येथे हनुमंताच्या दर्शनासाठी जाऊ. परंतु त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे माझे बुलढाणा येथे सहाय्यक धर्मदाय आयुक्त साहेब यांचे कडे केसेस असल्यामुळे मी भाऊंना हो म्हणावे की नाही म्हणावे असा माझ्या मनात विचार चालू असतानाच भाऊ मला म्हणाले की, आज तुमचे साहेब सुट्टीवर आहेत, काळजी करू नका, तशीच तारीख होते. परंतु माझ्या मनात संभ्रम असताना मी भाऊंना नकार न देता. वारी येथे श्री हनुमंताच्या दर्शनासाठी काकणवाड्या वरून भाऊ सोबत निघालो. भाऊ माझ्या मोटरसायकल वर बसले. ऑटो मध्ये रामराव पाटील,वसंत फोकमारे व इतर पाहुणे होते.

वारी येथे गेल्यानंतर हनुमंताचे दर्शन भाऊंनी घेतले व आम्ही सुद्धा घेतले. त्यानंतर वारी येथील मोटर सायकल स्टॅंडवर आल्या वर मी बुलढाणा येथे एडवोकेट मुनोत यांना फोन लावून आज मी बुलढाणा येथे येऊ शकत नाही असे त्यांना सांगितले. एडवोकेट मुनोत यांनी मला असे सांगितले की, आज धर्मदाय आयुक्त साहेब सुट्टीवर आहेत, काळजी नसावी, मी तारीख घेतो. एडवोकेट मनोज साहेब यांच्याशी झालेला संवाद भाऊंनी ऐकल्यानंतर ” आहेत ना साहेब सुट्टीवर, कशाला काळजी करता ” असे भाऊ म्हणाले व स्मित हास्य केले. भाऊंच्या चेहऱ्याकडे पाहून मी त्यांच्या वाक्यावर विश्वास न ठेवल्यामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग बदलला कारण मी भाऊंच्या वाक्यावर विश्वास न ठेवता परस्पर एडवोकेट मुनोत साहेब यांना साहेब सुट्टीवर आहेत किंवा नाही याबद्दल विचारणा केली. ही माझी चूक होती. परंतु भाऊंनी माझ्याकडे पाहून सोडून द्या तसे काही नसते.असे म्हणाले. या प्रसंगातून एवढाच अर्थबोध होतो की, सद्गुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवावा. त्यांच्या वाक्यावर संशय घेऊ नये.

त्यानंतर आम्ही परत शेगाव कडे येण्यास निघत असताना वारी हनुमान येथील मोटरसायकल स्टॅंडवर भाऊ मला म्हणाले की, ” मी तुमच्या मोटरसायकलवर बसत नाही, तुम्ही मोटरसायकल जोऱ्याने चालवता त्यामुळे आता तुम्ही रामराव पाटील यांना तुमच्या मोटरसायकलवर बसवा मी ऑटो मध्ये बसतो. ” त्यावेळी मला परत म्हणाले की, “तुमची मोटरसायकल फक्त सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांचे मंदिरात दर्शनात जाईपर्यंत मधात कुठेही थांबू नका , सरळ तुमची मोटरसायकल सोनाजी महाराज येथील मंदिरातच थांबवा.” भाऊंचे हे म्हणणे ऐकल्यानंतर माझ्या मोटरसायकलवर रामराव पाटील बसले आणि मी मोटरसायकल वारी हनुमान येथून सुरू केली. वारीच्या व सोनाळा रस्त्यावर वारीच्या पुढे नदीवर मोठा पूल लागतो. त्या पुलावर माझी मोटरसायकल आली असता समोरून आगे मोहाच्या माशाचा थवाच्या थवा माझे मोटर सायकलवर आला. आगे मोहाच्या माशा माझ्या संपूर्ण चेऱ्यावर व केसात तसेच रामराव पाटील यांच्या अंगास पूर्ण लागल्या होत्या.त्यावेळी रामराव पाटील मला म्हणाले की, मोटरसायकल थांबवा. परंतु मी त्यांना मान हलून नकार दिला . मोटर सायकल न थांबवता मोटरसायकल वेगाने चालू ठेवली. कारण मला भाऊंच्या वाक्याची आठवण झाली की, मोटरसायकल मधात थांबू नका ती फक्त श्री संत सोनाजी महाराज यांचे मंदिरातच दर्शनासाठी थांबवा. त्यामुळे मी मोटरसायकल ज्या वेगात होती.त्याच वेगाने चालवीत होतो. अशाप्रकारे आमच्या दोघांच्या अंगावरील एक एक माशी उठून जात होती. एकाही आगे मोहाच्या माशी ने आम्हाला दंश केला नाही. आम्ही या विचारातच श्री संत सोनाजी महाराज सोनाळा यांचे मंदिरात केंव्हा पोचलो हे आम्हाला कळले सुद्धा नाही. मी व श्री रामराव पाटील यांनी श्री संत सोनाजी महाराज यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या मंडपात थांबलो असता. सदर ऑटो रिक्षा श्री संत सोनाजी महाराज मंदिर परिसरात भाऊंना घेऊन आला. भाऊंनी ऑटो रिक्षातून उतरल्यानंतर माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि म्हणाले की, “रस्त्यात सोनाजी महाराजांचे दर्शन झाले काय ? त्यावेळी मी भाऊंना नम्रपणे म्हणालो की, होय भाऊ, रस्त्यात सोनाजी महाराजांचे दर्शन झाले व तुम्ही आम्हास आज आगे मोहाच्या चावण्यापासून आम्हचे प्राण वाचविले व दर्शन सुद्धा घडविले. हे ऐकल्यानंतर भाऊंनी स्मित हास्य केले. भाऊंचे चेहऱ्यावरील भाव पाहून मी भक्तीरसात तल्लीन झालो. धन्य ही माऊली धन्य हे सद्गुरु. आगे मोहाची एक जरी माशी माणसात चावली तर त्याच्या असंख्य वेदना असतात. ह्या तर हजारो माशा होत्या. ह्या माशा आम्हा चावल्या असत्या तर आम्ही जागेवरच वेदनेने तळमळत पडून गतप्राण झालो असतो. परंतु ही सर्व लीला सद्गुरु भाऊ महाराजांची होती. या संपूर्ण संकटातून भाऊंनी आमचे प्राण वाचविले.

सदर प्रसंग जसा घडला आहे तसाच मी वर्णन केला आहे. भाऊ प्रति असलेले अनुभव संग्रहित करणे व पुढील भावी पिढीला यातून अध्यात्मिक भक्ती मार्गाचा आणि विज्ञानाचा अर्थबोध घेता यावा.यासाठी परमपूज्य श्री सद्गुरू भाऊ महाराज यांचे आलेले अनुभव संग्रहित करणे हे प्रत्येक भक्तांचे कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे.

तसेच आपले सद्गुरु भाऊ यांना त्रिकाला बाधित ज्ञान असल्यामुळे भूत भविष्य आणि वर्तमान काळातील संपूर्ण घटनाक्रमाची चाहूल त्यांना संपूर्ण रित्या माहीत होती व अवगत होती. सद्गुरु भाऊ महाराज हे साक्षात हनुमंताचे अवतार आहेत. अनुग्रहीत शिष्यांना भाऊंनी दिलेला मंत्र सदा सर्वकाळ जपावा. व रोजची साधना करावी. यातूनच भाऊंचे दर्शन वेळोवेळी भक्तांना होते. भाऊंच्या कार्यातच आणि सेवेत भाऊंचा सहवास असून संपूर्ण अस्तित्व रूपाने भाऊ लासुरा फाटा स्थित आश्रमात देव देवतेच्या रूपाने संतांच्या रूपाने संजीवनी रूपात साक्षात तेथे हजर आहेत. भक्तांवर आलेल्या संकटावर सद्गुरु भाऊ महाराज आपल्या कृपादृष्टीने व आशीर्वादाने भक्ताचे संकट आज रोजी सुद्धा दूर करीत आहेत. याचा अनुभव भक्त गणास येत असून त्या भावनेनेच भक्तगण या सेवा कार्यात जुळत आहेत.

🌹🙏जय श्रीराम 🙏🌹


परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचे संतकृपा शांती आश्रम लासुरा फाटा येथील देवी देवतांचे मंदिर बांधकाम करीत असताना सन 2021 ह्या वर्षामध्ये श्री महाकालेश्वराचे मंदिर बांधकाम करीत असताना परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचे समाधी मंदिराचे पाय खोदलेले असताना श्री महाकालेश्वरच्या मंदिराच्या उंच शिखरावरून विवेक फोकमारे हे कारागीर सरळ जवळपास 30-35 फुटावरून पाया खोदलेल्या कॉलमच्या जागेत डोक्यावर पडले.

परंतु विवेक पडताच ताबडतोब उभा राहिला. आणि लगतच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला तेथे दोन बकेटा डोक्यावर पाणी घेतले. सर्व कारागीर मंदिरचे बांधकाम सोडून धावत धावत खाली आले. आता काही खरे नाही असे म्हणून विवेक जवळ आले तर पाहता विवेक दोन बकेटा पाणी डोक्यावर घेताना दिसला. त्यावेळी सर्व कारागिरांनी विवेकची चौकशी केली असता मला भाऊंनी वाचवले एवढेच विवेक बोलला. त्यानंतर संबंधित कारागीरांनी विश्वस्तांना फोन करून ताबडतोब दवाखान्यात खामगाव येथे उपचारासाठी नेले. सर्व तपासण्याअंती फक्त विवेकच्या बोटाला लागले होते. दवाखान्यातून विवेक परत येतात परत कामावर सुरू झाला. ही सर्व सद्गुरु भाऊ महाराजांची लिला असून विवेक चे प्राण सद्गुरु भाऊ महाराज यांनीच वाचविले.