संत कृपा शांती आश्रम येथे मोफत होमिओपॅथी दवाखान्याचे उद्घाटन
परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज यांचे संत कृपा शांती आश्रम, लासुरा फाटा येथे आज दिनांक 23/11/2025, रविवार रोजी सकाळी 9 वाजता मोफत धर्मार्थ होमिओपॅथी दवाखान्याचे उद्घाटन डॉक्टर महेंद्र मोरखडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
ही मानसेवी सेवा डॉक्टर महेंद्र मोरखडे साहेब (शेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून तज्ञ डॉक्टर मंडळी –
डॉ. गौरी दिनेशराव घंगाळ, डॉ. कोमल मोहनराव डाकोरे, डॉ. सुजना काळे, डॉ. वैष्णवी पवार, डॉ. ऋषिकेश तायडे व डॉ. ऋषिकेश मुकुंदे यांच्या मार्फत रुग्णांची होमिओपॅथी तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीकृष्ण वामनराव ढगे, विश्वस्त श्री गजानन ढोले, श्री प्रल्हादराव सहस्त्रबुद्धे, डॉ. प्रा. म्हैसागर सर, श्री तुळशीराम पाटील शिंदे, श्री राजू पाटील म्हस्के (चितेगाव), श्री वासुदेवराव धुमाळे, श्री सुधाकर चव्हाण, श्री देवलाल ढगे, श्री प्रशांत सहस्त्रबुद्धे, श्री निरंजन पाटील, श्री प्रकाश बोरसे तसेच सेवक श्री विवेक साबे व श्री डिगांबर साबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा मोफत होमिओपॅथी दवाखाना दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कायमस्वरूपी रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. अधिकाधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी डॉक्टर महेंद्र मोरखडे यांनी होमिओपॅथी उपचारपद्धती व औषधांविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या वतीने सर्व तज्ञ डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले.
🙏 आरोग्यसेवेसाठी समर्पित एक स्तुत्य उपक्रम 🙏





