नवरात्र उत्सव २०२५

परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांच्या संत कृपा शांती आश्रम, लासुरा फाटा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी अष्टमीच्या दिवशी यज्ञयाग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा पवित्र यज्ञ श्री हरिभक्त परायण शुभम निळे महाराज यांच्या हस्ते पार पडला.

या यज्ञयागामध्ये परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचे निस्सीम भक्त — श्री देवमन शालिग्राम डोसे, श्री प्रशांत गजानन सहस्त्रबुद्धे, श्री गजानन वासुदेव मुकुंदे, श्री नामदेव जानराव ढोले, श्री योगेश सुभाष चतरकार तसेच संस्थेचे विश्वस्त श्री गजानन जगन्नाथ ढोले — यांनी सपत्नीक सहभाग घेतला.

परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचे निस्सीम भक्त आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री सुभाषराव कोल्हे तसेच संस्थेच्या विश्वस्त सौ. अर्चनाताई कोल्हे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *