आरती संग्रह

भक्तांना ऑनलाईनही या आरत्या वाचता व डाउनलोड करता याव्यात म्हणून हा विभाग उपलब्ध आहे. येथे श्री विनायक भाऊ महाराज, श्री गजानन महाराज, महादेव, महाकालिका माता, हनुमान व इतर आरत्या वाचायला मिळतील.

🪔 आरती श्री विनायक बाबा 🪔

आरती श्री विनायक बाबा॥धृ॥

दीनानाथ सद्गुरूंनाथा
कालियुगी हनुमंत
चरण दाखवावे आम्हा
आरती श्री विनायक बाबा॥धृ॥

व्याधी निवारण करुनि
लीला जनां दाखवुनी
उकळगावी जन्म घेऊनि
धारण केले मानवदेहा
आरती श्री विनायक बाबा॥धृ॥ 

नामचिंतन बळ
एकमुखी अविरत
सत्य संकल्पांचा दाता
चराचर परमेश्वरा
आरती श्री विनायक बाबा ॥धृ॥

ब्रह्मनाम साक्षी
दृष्टी पदोपदी आम्हा
आईसम माया
लाविली आम्हा जिवा
आरती श्री विनायक बाबा॥धृ॥

जय श्रीराम नाम
जप करावा सदैव
एक नाम तारी
आम्हा श्री विनायका
आरती श्री विनायक बाबा॥धृ॥

संपूर्ण संग्रह

डाउनलोड करा

श्री समर्थ सद्गुरू संत विनायकभाऊ महाराज स्तोत्र
पसायदान
श्री गजानन बावन्नी
हरिपाठ