संतकृपा शांती आश्रम, लासुरा फाटा, ता. शेगाव, जि. बुलढाणा

पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नं. E-968 (बुलढाणा)

हे परमपूज्य संत श्री विनायक भाऊ महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले धार्मिक व अध्यात्मिक केंद्र आहे. येथे भक्तांना अध्यात्मिक मनःशांती, जीवनातील यशासाठी मार्गदर्शन व तरुण पिढीला विज्ञान-आध्यात्माची सांगड देणारे कार्य घडते.

📜 गुरुमाऊलींचा परिचय

परमपूज्य संत श्री विनायक भाऊ महाराज यांचे जीवन भक्ती, सेवा व समाजकार्य या तिन्ही गुणांनी भरलेले आहे. त्यांनी त्यांच्या हयातीतच भक्तांच्या देणगीतून लासुरा फाटा येथे आश्रमाचे मुळ रोपटे रोवले. आश्रम परिसरात भक्तांच्या देणगीतून हॉल, खोल्या, विहीर, बोरवेल यांची उभारणी केली. आपल्या जीवनप्रवासात त्यांनी अनेक लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले. तरुण पिढीला अध्यात्मिकतेसोबत शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा यासाठी प्रेरित केले.

दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी गुरुमाऊलींनी समाधीपर साधना अवलंबली व या वैकुंठ भवनामध्ये समाधी घेतली. दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी समाधी पर्वाची सांगता करण्यात आली. आज हा आश्रम सर्व भक्तांसाठी दर्शनाकरिता खुला असून, येथे येणाऱ्या प्रत्येकाला अध्यात्मिक आशीर्वादाचा लाभ मिळत आहे.

📜 आश्रम स्थापनेचा इतिहास

आश्रम स्थापन व विकास

भक्तगणांच्या देणगीतून साधारण १०–१२ वर्षांपूर्वी आश्रमासाठी जमीन घेतली. धार्मिक धर्मादाय कार्यासाठी सरकारी परवानगी घेऊन बांधकाम सुरू झाले. आश्रम परिसरात तार कंपाऊंड, मोठा हॉल, दोन खोली आणि आवश्यक पाणी व्यवस्था उभी केली गेली. श्री राहुल मिटकरी यांनी विहीर खोदून दिली तर श्री भरत भवर यांनी बोरवेल पुरविला.

नोंदणी व न्यास

१९ जुलै २०२१ रोजी आश्रम अधिकृतपणे ‘संत कृपा शांती आश्रम न्यास’ म्हणून नोंदणीकृत करण्यात आला (प. ट्र. रजि. नं. ९६८ – बुलढाणा). न्यासासाठी ९ सदस्यीय विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली व ट्रस्ट डीड तयार केला गेला.

📜 मंदिरे व धार्मिक कार्य

गुरुमाऊलींच्या आज्ञेने येथे तीन प्रमुख मंदिरे उभारली गेली — महादेव शिवलिंग, महा कालिका माता व हनुमान मंदिर. मंदिरांच्या बांधकामासाठी भक्तांच्या देणगीमुळे व साहित्यांच्या मदतीमुळे काम सुरु झाले व विशेष विधीने बांधकामाची सुरुवात करण्यात आली.

परमपूज्य गुरुमाऊली विनायक भाऊ महाराज यांनी आश्रम स्थापन करून मंदिरांची देवता प्रस्थापित केली. त्यांच्या वचनाप्रमाणे, जो कोणी भाविक मनोभावे या देवतेची आराधना करेल त्यांची मनोकामना पूर्ण होईल व अध्यात्मिक शांती लाभेल. भाऊंनी तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी विशेष चालना दिली.

त्याचबरोबर, विविध गावांमध्ये श्री संत सखाराम महाराज, ह.भ.प. श्री राम महाराज, नाथ बाबा यांच्या सहवासातून मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक कार्य केले. तसेच भक्तगणांच्या देणगीतून सुमारे २५ ते २६ हनुमान मंदिरे व इतर मंदिरे बांधली गेली.